NCP Sharad Pawar on Mumbai Mahapalika Election: शरद पवारांची राष्ट्रवादी 50 पेक्षा जास्त जागांसाठी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
NCP Sharad Pawar on Mumbai Mahapalika Election: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर शरद पवारांच्या (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादीने देखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन आगामी रणनीती ठरवण्यात आली.
- राष्ट्रवादी काँग्रेस 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत.
- सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा केली.
- लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि मुंबई प्रांताचं शिबिर आयोजित होणार.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, आणि महायुतीमधील इतर पक्षदेखील स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचं सूचित केलं आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांची स्वतंत्र रणनीती निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.